पुणेहडपसर

वाहनांची तोडफड करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील गोसावीवस्तीमध्ये घडला प्रकार

हडपसर (प्रतिनिधी )
पूर्ववैमनस्यातून मारहाण करीत लोखंडी हत्यार हवेत भिरकावून दहशत पसरवित 25 वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना अटक केली. यश जावळे, सूरज पंडित, अक्षय राऊत अशी अटक केलेल्यांची नावे असून, युवराज बदे, समीर शेख याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर गोसावीवस्ती येथे आज (बुधवार, दि. 25 ऑक्टोबर) पहाटे चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहित भारत गायकवाड (वय 23, रा. गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. लोखंडी हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करीत 22 वाहनांची तोडफोड केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दोरकर पुढील तपास करीत आहेत.