पुणे

वाढदिवसानिमित्त शाळेत वृक्ष वाटप कुमार यश निखळच्या उपक्रमाचे होतेय कौतुक….

 

पुणे (प्रतिनिधी )
कुमार यश निखळ याच्या वाढदिवसानिमित्त साधना इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये वृक्षारोपण चा कार्यक्रम राबविण्यात आला, यशच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मूर्तिकार योगेश निखळ, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशिर, वर्गशिक्षक मोरे सर त्यांच्याबरोबर समृद्धी निखळ, राहूल बोरकर आदी उपस्थित होते.
असाच उपक्रम वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये राबवावा त्यामुळे एक विद्यार्थी एक झाड असे गणित बसेल असे वाटते आणि त्यामुळे पर्यावरण टिकून राहील असे पालक मूर्तिकार योगेश निखळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.