पुणेमहाराष्ट्र

सख्या काकाडून अल्पवयींन पुतणीवर अत्याचार ; लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल…!

पुणे प्रतिनिधी रमेश निकाळजे

पुणे : मागील काही महिन्यांपासून पुणे शहर हद्दीत मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशीच एक अत्याचाराची घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. चुलत्याला आपण नात्याने वडिलांच्या जागी मानत असतो.परंतु इथे मात्र चुलता म्हणजे नराधम असेच म्हणावे लागेल. कारण वडिलांच्या जागी असणाऱ्या नराधमाने मुलीसारख्या पुतणीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या चुलत्या विरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हा पीडित मुलीचा सक्खा चुलता आहे. तिच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. 22 ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी चुलत्याच्या दुकाना शेजारील खोलीमध्ये झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे जाऊन तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. सख्या चुलत्याने आपल्या 16 वर्षीय अल्पवयींन पुतणीवर जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना लोणीकंद येथे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी चुलत्या विरोधात बलात्कार, विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्या आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 पासून 22 ऑक्टोबर 2023 च्या मध्ये घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. 22 ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी त्यांच्या दुकानात शेजारील खोलीमध्ये झोपलेली होती.

त्यावेळी आरोपीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तिची आई त्या ठिकाणी धावत गेली. त्यावेळी तिने हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ पीडित मुलीला बाजूला ओढले आणि तिचा बचाव केला. मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या सोबतच आरोपीने 2022 मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.