पुणे

पुणे कोंढव्यातील बेकादेशीर पणे चालणाऱ्या दोन हुक्का पार्लरवर सामाजिक विभाग ( गुन्हे ) विभागाकडून कारवाई…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

महाराष्ट्र राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातल्यानंतर ही कोंढव्यातील दोन हॉटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापा टाकला, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा ६५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन हुक्का पार्लर चालकांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे, कोंढव्यातील लॅविटेट हॉटेल, आणी दि ब्रेक रुम हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली, दोन्ही हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे,

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली, सामाजिक
सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, मनीषा पुकाळे, अण्णा माने आदींनी ही कारवाई केली.