पुणे

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणारा पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई निलंबित…!

पुणे: प्रतिनिधि ( रमेश निकाळजे )

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाला शहर पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाने समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी तरुणीला दिली होती.

अरफाज अरीफ शेख असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे, विवाहाचे आमिष दाखवून शेख याने वेळोवेळी तरुणीवर बलात्कार केला होता,तसेच त्याने प्रसारमाध्यमावरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी पण दिली होती,याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिल्यानंतर अरफाज शेख याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, शेखने केलेले वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे तसेच शिस्तीस बाधा आणणारे असल्याचा ठपका ठेवून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी पोलीस शिपाई अफराज शेख याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.