पुणेमहाराष्ट्र

अपहृताचा जीव वाचवित, तिघांना माळशिरसमधून केले जेरबंद

कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी ः
पुणे, दि. १३ ः अपहरण करून डांबून ठेवलेल्याची सुटका करीत तिघांना कोंढवा पोलिसांनी माळशिरसमधून अटक केली. सूरज राजेंद्र मोरे (रा. कात्रज, पुणे), विक्रमसिंग लक्ष्मणराव पाटील (रा. दत्तनगर खंडाळी, ता. माळशिरस), प्रसाद कुलकर्णी (रा. घोंगडे गल्ली, पंढपूर, सध्या- कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, अमित चव्हाण असे अपहरण करून सुटका केलेल्या नाव आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, अपहरण केलेल्या व्यक्तीला माळशिरस येथे डांबून ठेवल्याची माहिती सूत्रांकडून कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपहरण केलेल्याची सुटका करून आरोपीला बेड्या ठोकल्या. अधिक तपासामध्ये अपहरण केलेले अमित चव्हाण याच्याविरुद्ध फसवणूक करून बलात्कार केल्याची तक्रार कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये असल्याचे उघडकीस आले. अटक केलेल्या सूरज मोरे याच्यावर विश्रामबाग, विक्रमसिंग लक्ष्मण पाटील याच्यावर वेळापूर, लातूर, तर प्रसाद सुनील कुलकर्णी याच्यावर शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल असून, तिघांनाही अटक केली आहे.

 

पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार सतिष चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सुजित मदन, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.