- पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या जागेवरून चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून लढण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत मोहन जोशी,अरविंद शिंदे, बाळासाहेब शिरवकर,अनंत गाडगीळ, प्रवीण दादा गायकवाड इत्यादी.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रवीण दादा गायकवाड यांचे नाव शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सुचवले आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड हे शरद पवार यांचे खूप निकटवर्तीय आहेत व शरद पवार यांना ते आदर्श मानतात.
प्रविणदादा गायकवाड हे व्यावसायाने यशस्वी बिल्डर आहेत. त्याच बरोबर ते सामाजिक नेते म्हणुन असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसेवा खा. शरद पवार यांचे खास विश्वासु निकटवर्तीय म्हणुन त्यांची ओळख आहे. राज्यासह देशात बदलेली सामाजिक परिस्थिती, आरक्षण लढ्यातील जुने नेतृत्वं, तसेच बहुजन समाजातील सर्वसमावेशक चेहरा व मिडीयासमोरील एक अभ्यासु प्रखर परखडक नेता अशी प्रविण दादा गायकवाड यांची ओळख आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी भुमिका असलेले एकमेव नेते म्हणुन सध्या सामाजिक संघटना व पक्ष पातळीवर यांच्याकडे काँग्रेस पाहत आहे. हि ऊमेदवारी जर काँग्रेस ने दिलीच तर पुणे लोकसभा काँग्रेस साठी सहज मिळु शकते असा विश्वास पुण्यातील लोकांनी दर्शवला आहे.
