Uncategorizedमंबई शहर

पंतप्रधान गडकरी होणार नरेंद्र मोदी नाही – प्रकाश आंबेडकरांचे भाकीत

मुंबई: नरेंद्र मोदी नव्हे तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असे भाकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले आहे.

नरेंद्र मोदी नव्हे तर नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढील पंतप्रधान असतील, असे सांगून आंबेडकर यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केले आहे. संघ आणि काँग्रसचे विचार जुळतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.  त्यामुळे आंबेडकर महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.त्यांना ४ जागा देण्याची तयारीदेखील काँग्रेसने दर्शवली आहे. मात्र आता आंबेडकर यांनी संघ आणि काँग्रेसचे विचार जुळत असल्याची टीका केल्याने महाआघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.वंचित आघाडीला एकूण १२ जागा हव्या आहेत.भारिपने आघाडीत याव. पण एमआयएमला आघाडीत स्थान नसेल, अशी अट काँग्रेसने घातली असल्याने आंबेडकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

0 0 votes
Article Rating
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments