पुणे

बारामती येथील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी, आरोपीना अटक करून कडक कारवाई करावी : डॉ.नीलम गो-हे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना नीलम ताई गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडाछेड केल्याच्या घटनेतील आरोपींवर पॉस्को आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.

पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली.त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांकडे याबाबतची तक्रार देताच, आरोपी विरोधात विविध कलम लावून पॉस्को आणि एट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला.पण त्या आरोपींना अटक करण्यात आली नाही.यामुळे पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्ती केली आहे.पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार आणि सध्या गावातील एकूणच वातावरण, याबाबत पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी मला सविस्तर माहिती दिली आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी तात्काळ ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन लावून,त्या घटनेतील सध्याची माहिती जाणून घेतली.त्यावेळी पोलीस तपास पथकाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत, पीडित मुलीच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन केले पाहिजे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.