प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर – कदमवाक् वस्ती ग्रामपंचायत हद्दीत दि.१४/०५/२०२५ रोजी ३ वा. च्यासुमारास फोर अव्हेन्यु सोसायटीच्या पाठीमागे आरोपी सोहेल युसुफ पठाण (वय १९ वर्षे रा. फोर अव्हेन्यु सोसायटीचे मागे, जयहिंद नगर, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) ह्याच्या जवळ एकुण ११० ग्रॅम वजानाचा गांजा मिळून आला आहे. त्याचप्रमाणे त्याने सदर गांजा ज्याच्या कडुन घेतला तो आरोपी सद्दाम अन्वर शेख रा. फोर अव्हेन्यू सोसायटीच्या मागे, जयहिंद नगर, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे ,याने त्याच्या राहत्या घरात एका कॅरीबॅगमध्ये गांजा विक्रीसाठी लपवुन ठेवला होता.त्याच्या घराच्या झडती दरम्यान पोलीसांना त्याच्या घरामध्ये गांजा दिसून आला.तसेच पोलीसांनी तो गांजा पंचांसमक्ष जप्त केला.वरिल दोन आरोपी विरोधात एन.डी.पि.एस. कायदा कलम २० (ब) बी. एन. एस. कलम ३ (५) प्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. १४/०५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कागगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५. डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे, म.पो. हवा. ज्योती नवले, म.पो. शि. यादव, पो. शि. गाडे पो. शि. संदिप धुमाळ, यांनी केली आहे.
अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.