पंढरपूरला जाणा-या आषाढी वारीत काल इतिहासात कधीही न घडलेली, हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
गेल्या शेकडो वर्षांपासून निर्विघ्नपणे चालत आलेल्या वारकऱ्यांच्या वारीला काल पहिल्यांदाच काळीमा फासला गेला.
दौंडजवळ एका चिमुकल्या वारकरी मुलीवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या अंगावरील दागिनेही लुटण्यात आले.
ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर ती संपूर्ण वारकरी परंपरेवरचा हल्ला आहे.
वारकऱ्यांच्या श्रद्धेवर, भक्तीवर, आणि सुरक्षिततेवर घाला घालणारे अजूनही मोकाट आहेत.
गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे.
पण त्यांनी केवळ पक्षफोडी, आमदारांची खरेदी-विक्री, आणि राजकीय तमाशात रमणे एवढेच काम केले आहे.
सामान्य जनता, महिला, आता निष्पाप वारकरीही सुरक्षित नाहीत, आणि गृहमंत्र्यांकडून एक शब्दही नाही!
या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,
किंवा निदान पांडुरंगाच्या चरणी नाक घासून समस्त वारकरी बांधवांची माफी मागावी,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप यांनी केली आहे.