पुणे

पॅरामेडिकल शिक्षणात मोलाचे योगदान; ॲड.कृपाल पलूसकर यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’

पुणे – (प्रतिनिधी)

पॅरामेडिकल आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्यामुळे के पी पॅरामेडिकल इन्स्टिटयूटचे संस्थापक व अध्यक्ष ॲड.कृपाल पलूसकर यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिनेअभिनेते भरत जाधव आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ॲड.कृपाल पलूसकर यांना शाल, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि कृतज्ञतेची गौरवमुद्रा देत सन्मानित करण्यात आले.

 

ॲड.कृपाल पलूसकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व निमशहरी भागात पॅरामेडिकल शिक्षणाची गंगा पोहोचवत हजारो विद्यार्थ्यांना स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न समाजघटकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.

पुरस्कार वितरण समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांनी पलूसकर यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#शिक्षणरत्नपुरस्कार
#कृपालपलूसकर
#ParamedicalEducation
#BharatJadhav
#PurushottamKhedekar
#SocialImpactThroughEducation
#KPEducation
#शिक्षणाचा_विजय