करकंब |
रोटरी क्लब ऑफ करकंब यांच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय, करकंब येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय, राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर सुवर्ण पदक व विशेष पुरस्कार प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे कौतुक वाटावे आणि अधिक यशाच्या दिशेने प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागचा उद्देश होता.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी यांना एक संपूर्ण संगणक सिस्टिम भेट म्हणून प्रदान करण्यात आली. ही आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने मोलाची ठरणार आहे.
तसेच, शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून पर्यावरण जागृतीचाही संदेश देण्यात आला. रोटरी क्लब ऑफ करकंबने समाजहिताच्या दृष्टीने राबवलेले हे उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहेत.
रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व भेटवस्तू देऊन एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. अशी माहिती आयोजक निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव यांनी दिली.