पुणे

“फुरसुंगीत युवकाचा धारदार हत्याराने खून करून पसार झालेल्या आरोपींना ठोकल्या बेड्या… हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचा पाठलाग अन आरोपी जेरबंद…

फुरसुंगी येथे रात्री युवकाचा धारदार हत्याराने खून करून पसार झालेल्या आरोपींना हडपसर तपास पथकाने अतिशय शिताफीने पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोपी १) प्रतिक पोपट कामठे वय २४ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. २) शुभम सुधाकर गायकवाड वय २१ वर्ष रा. सदर ३) आशितोष ऊर्फ सोन्या शरद पोटे वय २१ वर्ष रा. जैननगर फुरसुंगी पुणे. ४) स्वराज सुनील दोरगे वय १९ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. ५) अनिकेत ज्ञानेश्वर कटके वय १९ वर्ष रा. बॅदवाडी फुरसुंगी पुणे. यांना बोरीबेल दौड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. १६ रोजी रात्री ०१.५० वा. चे सुमारास फिर्यादी शिवलींग ज्ञानदेव पांढरे व मयत वैभव विठ्ठल गायकवाड हे अॅक्टीवा गाडीवरून मिठाचे गोडावून पाठीमागे फुरसुंगी रोडने जात असताना गाडीमागुन आलेल्या दोन मोटार सायकल वरील ५ आरोपी यांनी वैभव गायकवाड याचे मानेवर, गळ्यावर, तोंडावर, डोक्यावर, छातीवर हातावर धारदार हत्याराने सपासप वार करुन व लाकडी दांडक्याने मारुन वैभव गायकवाड याला जीवे ठार मारले. Hadapsar Police Station हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ८८१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५. भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्यातील आरोपी प्रतिक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोर्ट, अनिकेत कटके व स्वराज दोरगे यांचे बाबत तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे , पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार यांनी माहीती घेतली असता, ते गुन्हा झालेनंतर फरार झाले होते. तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. आरोपींबाबत पुढे काहीएक उपयुक्त माहीती मिळत नसल्याने तपासपथकाने पुणे सोलापूर हायवेवरील रोडने मिळणा-या सीसीटीव्ही फुटेज आधारे तिन दिवस टेंभुर्णी, कुर्डुवाडी, माढा, वैराग या भागातील ३०० हून अधिक फुटेज तपासात आरोपींचा माग काढला. आरोपी हे वैराग ते माळवंडी पासून पुढे गेले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर हडपसर तपास पथकाने वैराग इले, सुडी, माळवंडी या ग्रामिण भागात स्थानिक नागरिक, पोलीस पाटील यांचे मदतीने माहीती काढत, आरोपी यांनी माळवंडी भागत वास्तव्य करून परत ते पुण्याचे दिशेने रवाना झाले बाबत माहीती मिळवली. तपासपथकाने आरोपींचा जाण्याचा मार्ग निश्चीत करून त्या मार्गावरिल फुटेत तपासात आरोपी हे सोलापूर पुणे हायवे ने जात असल्याबाबत उपयुक्त माहीती गोळा करून आरोपींचा पाठलाग करत आरोपी १) प्रतिक पोपट कामठे वय २४ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. २) शुभम सुधाकर गायकवाड वय २१ वर्ष रा. सदर ३) आशितोष ऊर्फ सोन्या शरद पोटे वय २१ वर्ष रा. जैननगर फुरसुंगी पुणे. ४) स्वराज सुनील दोरगे वय १९ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. ५) अनिकेत ज्ञानेश्वर कटके वय १९ वर्ष रा. बॅदवाडी फुरसुंगी पुणे. यांना बोरीबेल दौड येथून ताब्यात घेतले. आरोपींना हडपसर पोलीस ठाणेस घेवून येवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी मयत वैभव गायकवाड याचेबरोबर ऊरूसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे सांगीतले. पुढील तपास प्रतापसिंह शेळके, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार पुणे शहर, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पूर्व प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, व परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, यांचे मागदर्शनाखाली हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन अरविंद गोकुळे, पोनि (गुन्हे) विश्वास डगळे, यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.