पुणे

समाजासाठी रात्रीचा दिवस करणारा, जनसामान्यांचा हक्काचा माणूस, शिवराज काळभोर.

हवेली प्रतिनिधी:- अमन शेख.

लोणी काळभोर येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्याबद्दल, प्रहार विध्यार्थी संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, व दिव्यांगांना मदत मिळावी म्हणून त्याच्याकडून वेगवेगळ्या योजनेचे अनेक फ़ॉर्म देखील भरू घेण्यात आले, काही दिव्यांगाना “UDID CARD” चे वाटप यावेळी करण्यात आले, दिव्यांग मंत्रालय स्थापन होणे ही बाब आनंदाची पर्वणीच आहे, म्हणूनच सर्व दिव्यांग बांधवांनी, आणि प्रहार विध्यार्थी पुणे जिल्हा प्रमुख शिवराज मनोजराव काळभोर व मनोजराव काळभोर, या “पिता-पुत्रांनी” एकत्र येऊन आलेल्या सर्व दिव्यांगाना पुष्पगुच्छ व मिठाई चे वाटप करून आपला आनंद मोठ्या उत्सवात साजरा केला, व सर्वांचे आभार व्यक्त केले.
सध्याचे राजकारण पाहता केवळ आपली पोळी कशी भाजली जाईल व ती पोळी दडवून कशी खाता येईल याकडेच फक्त काही “स्वयंघोषित” राजकीय लोकांचा कल असतो, आपण राजकारणात, कशासाठी आलो आहोत याचाच विसर सध्या राजकीय मंडळीना पडलेला असून ८०% समाजकारण व २०% राजकारण याच्या नेमके उलट राजकीय मंडळी वागताना दिसून येतात, परंतू असे असताना देखील बेपर्वा दुनियेची तमा न बाळगता, लोणी काळभोर परिसरातील एक युवक सर्व राजकारण बाजूला सारून समाजकार्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवताना, सर्वांचे लक्ष मात्र आपल्याकडे वेधून घेतना दिसत आहे, पुणे जिल्हा प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शिवराज काळभोर यांना सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, यांचे नाव सध्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे पंचक्रोशीत पसरत आहे, वयाच्या सोळाव्या वर्षापासून सामाजिक कार्यात त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना आपल्या माय मराठीचा ओढा देखील त्यांनी जपलेला आहे, समजातील गोर-गरीब, अपंग, विद्यार्थी, मोलमजुरी करणाऱ्यांसाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काने हा तरुण लढताना दिसत आहे.