पुणे

मांजरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पोपट गणपत उंदरे पाटील यांची निवड

पुणे (प्रतिनिधी)
मांजरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पोपट गणपत उंदरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
सोसायटीचे विद्यमान चेअरमन दादासाहेब उत्तम उंदरे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदी जिल्हा उपनिबंधक कार्यालया कडून निवडणूक घेण्यात आली.निवडणूक प्रक्रिया दरम्यान मुदतीत चेअरमन पदासाठी एकमेव पोपट उंदरे यांचा अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी/अध्याशी अधिकारी सचिन चव्हाण यांनी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. प्रसंगी सोसायटीचे सचिव आबासाहेब गोसावी, तेरा पैकी बारा सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी पोपट उंदरे यांचा ग्रामस्थ, सभासदाचे वतीने सत्कार करण्यात आला.सर्वांना विश्वासात घेऊन सभासदांचे हिताचे निर्णय सर्वानुमते घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पोपट उंदरे यांनी दिले.