पुणे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मातृशोक

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मातोश्री कांताबाई लक्ष्मण चव्हाण (वय 86) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.उद्या (दि.6 डिसेंबर) सकाळी नऊ वाजता पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.