पुणे

“गणेशोत्सवातील गर्दी नियोजनासाठी पोलिसांकडून विशेष प्रशिक्षण – नागरिक, स्वयंसेवक आणि मंडळांना मार्गदर्शन”

पुणे | २३ ऑगस्ट २०२४

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गर्दी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवात लाखो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने, सुरक्षितता व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक तसेच ४०० हून अधिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश – गर्दीत शिस्त राखणे, आपत्तीजनक परिस्थितीत त्वरित उपाययोजना करणे, पोलिसांना सहकार्य करणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा होता.

प्रशिक्षण शिबिरास पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ.राजकुमार शिंदे उपस्थित राहिले. त्यांनी नागरिक आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी शिस्तबद्ध पद्धतीने हालचाल, आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे, क्राऊड कंट्रोल बॅरिकेड्स, पोलिसांच्या सूचनांचे पालन आणि वाहतूक व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

या प्रसंगी उपस्थित सर्व सहभागींसाठी प्रात्यक्षिक प्रात्याक्षिकेही घेण्यात आली. स्वयंसेवक व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग घेतला.