पुणे

“हडपसरमधील भाजपचे सतीश भिसे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात; पुणे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती”

पुणे | (प्रतिनिधी)
हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सतीश शिवाजीराव भिसे यांनी औपचारिकरित्या भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना अधिकृतरित्या पक्षात सामावून घेण्यात आले. यावेळी त्यांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सरचिटणीसपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.
यानंतर वानवडी येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन भिसे यांचे अभिनंदन केले.
भिसे यांच्या प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला पवार नवसंजीवनी मिळणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

“भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. सतीश भिसे यांचा प्रवेश हा केवळ राष्ट्रवादीसाठी नाही तर पुणे शहरातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे हडपसर मतदारसंघात पक्ष अधिक बळकट होईल.”
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष

“मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. पक्षाने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन. हडपसरमधील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी सदैव लढत राहीन.”

सतीश भिसे
नवनियुक्त सरचिटणीस