फोनवाल्यांना मोकळीक, सामान्यांना दंड? हडपसरमध्ये वाहतूक पोलिसांवर दुजाभावाचे आरोप!
Hadapsar मधील सम्राट चौक परिसरात बुधवारी सायंकाळी वाहतूक शाखेची कारवाई सुरू होती.
मात्र या कारवाईदरम्यान सामान्य वाहनचालकांनाच लक्ष्य केलं जातंय, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याशी आणि त्याच्या वडिलांशी अर्वाच्य भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप आहे.
दंड भरण्यासाठी तो Manjari येथून येतोय असं सांगितल्यावर
“तोपर्यंत थांबू का?” असं विचारून फोन कट केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
नागरिकांचा सवाल आहे—
“कायदा सर्वांसाठी समान असेल, तर अधिकारी, नगरसेवक, आमदार किंवा खासदारांचा फोन आला की तत्काळ सोडून देतात—हे बरोबर आहे का?”
अशी दुजाभावाची वागणूक लोकशाहीच्या तत्त्वांना धरत नाही, असा रोष व्यक्त केला जातोय.
दरम्यान, वाहतूक शाखेतील अधिकारी राजेंद्र करणकोट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की,
“कारवाईदरम्यान अनेकजण फोन करून वेळ घालवतात. त्यामुळे प्रक्रिया विलंबित होते; मग पावत्या कशा करायच्या?”
नियमांची अंमलबजावणी करताना अडथळे येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या पार्श्वभूमीवर Pune Police प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी,
अपमानास्पद वागणूक थांबवावी आणि कायदा सर्वांसाठी समानपणे लागू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पारदर्शक, न्याय्य कारवाईच विश्वास परत आणू शकते—हे प्रशासन लक्षात घेईल का?
