महाराष्ट्र हादरला! शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार; गावकऱ्यांचा संताप

Rokhthok Maharashtra 17 0

महाराष्ट्र हादरवणारी एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे.

मेहकर तालुक्यातील एका गावात, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या 58 वर्षीय शिक्षकावर
इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार उघडकीस येताच गावात संतापाची लाट उसळली.

शेकडो ग्रामस्थ शाळेत जमा झाले आणि आरोपी शिक्षकाला मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच डोनगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत
आरोपीला ताब्यात घेतलं.

सध्या पीडित मुलींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असून,
पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.