पुणे

गावातला भन्नाट किस्सा! “सोन्या” हाल्या रेस जिंकतो, मालकाची भन्नाट हौस

प्राण्यांवर प्रेम करणारे अनेकजण कुत्रे, मांजर पाळतात… पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील निंबळक गावात एक वेगळंच उदाहरण पाहायला मिळतंय.
इथल्या सोमनाथ खंडू पवार या युवकाने चक्क “हाल्या” पाळला आहे… आणि तोही फक्त हौसेपोटी नाही, तर अगदी कुटुंबातील सदस्यासारखा!
“सोन्या” नावाचा हा हाल्या केवळ घरातच नाही, तर रेसमध्येही धावतो… आणि विशेष म्हणजे त्याने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसेही पटकावली आहेत. त्यामुळे परिसरात सोन्याची चांगलीच चर्चा आहे.

सोमनाथ पवार यांचा या प्राण्यावर प्रचंड जीव आहे. त्याची देखभालही ते अत्यंत काळजीपूर्वक करतात. रोज सकाळी ५ किलो आणि संध्याकाळी ५ किलो असा भरपूर खुराक त्याला दिला जातो. त्याचबरोबर हा हाल्या ब्रिडिंगसाठीही उपयोगी ठरत असल्याचं ते सांगतात.
ग्रामीण भागात अशा प्रकारे प्राण्यांशी जुळलेलं नातं आणि त्यातून निर्माण होणारी ओळख… हे खरंच प्रेरणादायी आहे.
सोमनाथ पवार आणि त्यांचा “सोन्या” हा हाल्या… आज केवळ गावातच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.