पुणे

| आईनेच केला मुलाचा खून 😱 25 हजारांची सुपारी देऊन रचला कट!

हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे…
अनैतिक संबंध आड येत असल्यामुळे आईनेच स्वतःच्या मुलाचा खून केल्याची घटना उघड झाली आहे.
सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. चेहरा दगडाने ठेचलेला… ओळख पटवणंही अवघड!
पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक सत्य समोर आलं…

मृत तरुण सचिन राजगुरु… आणि त्याच्या खुनामागे निघाली त्याचीच आई!
आईचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते… आणि मुलाला याची माहिती झाल्यानंतर तो अडथळा ठरू लागला.
मग काय? २५ हजारांची सुपारी देऊन प्रियकराच्या मदतीने कट रचला गेला…
दारू पाजून उमरदरा शिवारात नेलं आणि दगडाने ठेचून खून केला!
या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली आहे.
नात्यांना काळिमा फासणारी ही घटना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे…