पुणे

2 वर्षांच्या शंभूचा साप चावल्याने मृत्यू! आईसमोरच घडली हृदयद्रावक घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे…
दोन वर्षांचा छोटा शंभू दांडगे घरात जिन्यावर खेळत होता.
अंधारात एक कोब्रा साप लपून बसला होता… आणि नकळत शंभूचा पाय त्याच्यावर पडला.
क्षणात सापाने दंश केला… आणि शंभू जोरात रडू लागला.

आईने धावत जाऊन त्याला उचललं आणि लगेच रुग्णालयाकडे धाव घेतली.
पण दुर्दैवाने… दवाखान्याच्या पायरीवरच त्या चिमुकल्याने प्राण सोडले.
या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…
उन्हाळ्यात साप बाहेर येण्याचं प्रमाण वाढतं,
म्हणून घराभोवती स्वच्छता ठेवा, अंधाऱ्या जागा टाळा, आणि विशेष काळजी घ्या.