शेतकरी कन्येचा कमाल! MPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम

Rokhthok Maharashtra 3 0

जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे.
Takli Bhima येथील ऋतुजा किसन वडघुले हिने Maharashtra Public Service Commission च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विशेष म्हणजे कर सहाय्यक, महसूल सहाय्यक आणि बेलिफ अशा तीन पदांसाठी तिची निवड झाली असून, ती कर सहाय्यक पद स्वीकारणार आहे.

 

शेतकरी कुटुंबातून आलेल्या ऋतुजाने प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात पूर्ण करत, स्वयंअध्ययनाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
“जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश नक्की मिळते,” असा संदेश ऋतुजाने इतर विद्यार्थ्यांना दिला आहे.
तिच्या या यशामुळे परिसरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.