नाशिक TCS मध्ये धर्मांतराचा दबाव? महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Rokhthok Maharashtra 19 0

नाशिकमध्ये Tata Consultancy Services मध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांवर कथित धर्मांतराचा दबाव आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित महिला कर्मचाऱ्याने सांगितलं की, टीम लीडर्स तौसीफ अत्तार आणि दानिश शेख यांनी पदाचा गैरवापर करत तिला वारंवार त्रास दिला. धार्मिक श्रद्धांचा अपमान, जबरदस्तीने मांसाहार करण्याचा दबाव आणि मानसिक छळ करण्यात येत होता.

इतकंच नाही, तर “धर्म बदललास तर तुझे वडील बरे होतील” असं सांगत तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गुप्तपणे केला आणि धक्कादायक पुरावे समोर आले. आतापर्यंत 7 जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.