हडपसरमध्ये आंबेडकर जयंती दिमाखात! महिलांचा सन्मान, सुरेखा पुणेकरांचा ‘नटरंगी नार’ गाजला

Rokhthok Maharashtra 16 0

पुण्यातील हडपसर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक रंगत यांसह दिमाखात साजरी करण्यात आली.
ससाणे नगर येथे आयोजित या भव्य महोत्सवाचे आयोजन आरपीआय नेत्या शशिकलाताई वाघमारे आणि पत्रकार राकेश वाघमारे यांनी केले होते.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मनपा स्वच्छता महिला कामगारांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून कष्टकरी महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
१५ एप्रिल रोजी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमाने उत्सवाला विशेष रंगत आणली. हजारो नागरिक आणि महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी माजी महापौर वैशाली बनकर, पोलीस अधिकारी मानसिंग पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक नितीन गावडे, योगेश ससाणे, मारुतीआबा तुपे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डीजेच्या गोंधळाला पर्याय देत सामाजिक आणि संस्कारक्षम कार्यक्रम सादर केल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, हडपसर परिसरात या जयंती महोत्सवाची जोरदार चर्चा आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.