पुणे

मदतीला उशीर… शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू |

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात… आणि एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत!
शुक्रवारी दुपारी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात
शिर्डीचे उद्योजक जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला…
तर मुलगा सुजित शेळके गंभीर जखमी आहे.
संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना
त्यांच्या कारची कंटेनरला मागून जबर धडक बसली…
धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली!
स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत
जखमी मुलाला बाहेर काढलं…

पण कार पूर्णपणे अडकली होती…
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं –
अनुराधा शेळके मदतीसाठी आर्त हाक देत होत्या…
पण त्यांना वाचवणं शक्य झालं नाही!
सर्वात धक्कादायक म्हणजे –
अपघात दुपारी सव्वा बाराला झाला…
पण क्रेन तब्बल दोन वाजता घटनास्थळी पोहोचली!
स्थानिकांचा आरोप –
“वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचू शकला असता!”
सध्या जखमी सुजितवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात…
आणि उशिरा पोहोचणारी मदत यंत्रणा…
हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.