अधिकाऱ्यानेच माहिती फोडली! वडगाव-धायरीतील RMC कारवाई थांबली

Rokhthok Maharashtra 22 0

वडगाव आणि धायरी परिसरातील नऊ बेकायदा आरएमसी प्लांटवर आज कारवाई होणार होती… पण ऐनवेळी ही मोहीमच थांबली!
कारण काय?
महापालिकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही गोपनीय माहिती आधीच लीक केली.
होय, कारवाईची खबर आधीच प्लांट मालकांपर्यंत पोहोचली… आणि त्यामुळे प्रशासनाची संपूर्ण मोहीम फसली.
या घटनेनंतर महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

आता सर्वांचे लक्ष आहे त्या ‘फुटीर’ अधिकाऱ्याकडे, ज्याने ही माहिती बाहेर दिली.
तो अधिकारी कोण?
त्याच्यावर काय कारवाई होणार?
आणि बेकायदा प्लांट्सवर पुन्हा कारवाई कधी?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
पुण्यातील ही धक्कादायक घडामोड… पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.