फॅटी लिव्हरचा वाढता धोका, तरुणांमध्येही वाढते प्रमाण

Rokhthok Maharashtra 15 0

भारतात दर 3 पैकी 1 व्यक्ती “मेटाबॉलिक सिंड्रोम” या सायलेंट आजाराने प्रभावित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, वाढलेली साखर आणि कोलेस्टेरॉल या समस्या एकत्र आल्यास हा आजार होतो.

यामुळे यकृतात चरबी साचून MASLD म्हणजेच फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. हा आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही, त्यामुळे तो उशिरा लक्षात येतो. पुढे तो लिव्हर डॅमेज, सिरोसिस किंवा कॅन्सरपर्यंत गंभीर होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, चुकीचा आहार, कमी व्यायाम, तणाव आणि धूम्रपान ही यामागची मुख्य कारणे आहेत. विशेष म्हणजे हा आजार तरुणांमध्येही वेगाने वाढत आहे.

वर्ल्ड लिव्हर डे 2026 निमित्त “Solid Habits, Strong Liver” हा संदेश देण्यात आला आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी केल्यास हा आजार टाळता आणि नियंत्रणात ठेवता येतो.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.