महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण चांगलंच तापलं आहे…
आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे!
फडणवीस म्हणाले…
“विरोधक हे सीरियल लायर्स आहेत… रोज खोटं बोलत आहेत!”
त्यांनी आरोप केला की,
२०२३ मध्ये विधेयकाला समर्थन देणारे विरोधक
आता बहुमत नसल्यामुळे खरे रंग दाखवत आहेत.
“महिला आरक्षणाला विरोध करून
नारी शक्ती आणि लोकशाहीचा अपमान झाला आहे,”
असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
डिलिमिटेशन आणि जनगणनेवरही
विरोधक खोटं पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याचवेळी फडणवीसांनी ओपन चॅलेंज देत म्हटलं—
“कोणीही माझ्यासोबत या विषयावर डिबेट करायला तयार असेल,
तर मी तयार आहे!”
तसेच त्यांनी अर्बन नक्षलवादावरही निशाणा साधत
तरुणांमध्ये चुकीचे विचार पसरवले जात असल्याचा आरोप केला.
“झूठ की उम्र बड़ी नहीं होती…
सच कभी समाप्त नहीं होता,”
असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत…
“सीरियल लायर्स!” फडणवीसांचा जोरदार हल्ला 🔥
