पुण्यातील नर्हे परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ऋषिकेश राजू जाधव, वय 26, रा. तिडके डेअरी, नर्हे रोड…
या तरुणाने पोलिसात भरती झाल्याचा बनाव रचत सर्वांची फसवणूक केली! 😳
पोलीस झाल्याचा आनंद साजरा करत त्याने पेढे वाटले,
चौकात मोठा अभिनंदनाचा फ्लेक्सही लावला…
पण ट्विस्ट तेव्हा आला,
जेव्हा खरे पोलीसच त्याच्या घरी अभिनंदनासाठी पोहोचले! 🚨
आणि तिथेच सगळा भांडाफोड झाला.
लहानपणापासून पोलीस होण्याचं स्वप्न…
पण उंचीच्या अटीत न बसल्याने आणि लग्नाच्या दबावातून
त्याने घेतला हा चुकीचा निर्णय.
👉 सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे.
