नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणाने सध्या मोठी खळबळ उडवली आहे. काही आरोपींवर जबरदस्ती धर्मांतरण, महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि काळ्या जादूसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासादरम्यान अखेर अनलॉक करण्यात आला आहे.
विशेष न्यायालयाच्या परवानगीने फेस आयडीच्या मदतीने मोबाईल उघडण्यात आला असून, त्यातून महत्त्वाचा डेटा मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या डेटाच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे जात आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात एंट्री घेत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात करण्यात आलेले सर्व आरोप गंभीर असून, त्याची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून सखोल चौकशी सुरू आहे.
