पुणे

भोंदू मनोहर मामाचा काळा खेळ! ९० आमदार वाढदिवसाला? २७ एकरांचा मठ आणि धक्कादायक सत्य

महाराष्ट्रात ‘भोंदू बाबा’ म्हटलं की अनेकांची नावं समोर येतात… पण सध्या सर्वाधिक चर्चेत आहे मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा!
स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ सांगणाऱ्या या व्यक्तीने साध्या छपराच्या घरातून सुरुवात केली… आणि पाहता पाहता २७ एकरांवर आलिशान मठ उभा केला!
सुरुवातीला गावागावातून भविष्य सांगण्याचा धंदा… नंतर भक्तांची संख्या वाढली… आणि मग थेट पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंत ‘दरबार’ भरू लागले.
धक्कादायक म्हणजे… एका वाढदिवसाला तब्बल ९० आमदार उपस्थित होते, असा दावा समोर आलाय! पुढच्या वाढदिवसाला १५० आमदार येणार असल्याचा दावा करून गावकऱ्यांवर दबाव टाकल्याचंही सांगितलं जातं.

भक्तांकडून विटा, सिमेंट, पैसे… आणि हजारो रुपयांच्या ‘पावत्या’ घेऊन भविष्य सांगणं… हा सगळा खेळ सुरू होता.
पण २०२१ मध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला… अटक झाली… आणि जामिनावर बाहेर येताच पुन्हा नवा मठ, नवा दरबार!
दरम्यान, अनेक मोठे राजकीय नेते, उद्योगपती, कलाकार यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले… ज्यामध्ये नितीन गडकरी, शरद पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो चर्चेत आले.
आता फसवणूक आणि शोषणाच्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे… आणि नागरिकांना पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.
प्रश्न मात्र एकच —
भोंदूगिरीचा हा खेळ इतका मोठा झाला तरी तो थांबवायला एवढा वेळ का लागला?