आजकाल किडनी स्टोन ही खूप सामान्य समस्या झाली आहे…
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना या त्रासाला सामोरं जावं लागतं…
यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, कमी पाणी पिणं
आणि चुकीचा आहार…
आज आपण जाणून घेऊया असे 5 पदार्थ
जे किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकतात…
पहिला – पालक
पालक आरोग्यासाठी चांगला असला तरी त्यात ऑक्झॅलेट जास्त असतं…
हे कॅल्शियमसोबत मिळून स्टोन तयार करू शकतं…
दुसरा – सुकामेवा आणि बिया
बदाम, काजू, शेंगदाणे आणि काही बियांमध्येही ऑक्झॅलेट असतं…
जास्त खाल्ल्यास धोका वाढू शकतो…
तिसरा – चॉकलेट आणि कोको प्रोडक्ट्स
हे पदार्थ चविष्ट असले तरी त्यांचं जास्त सेवन टाळणं गरजेचं…
चौथा – जास्त मीठ असलेले पदार्थ
जास्त मीठामुळे शरीरातून कॅल्शियम बाहेर पडतं
आणि त्यामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते…
पाचवा – रेड मीट, चिकन आणि अंडी
यांचं अतिसेवन केल्याने युरिक ॲसिड वाढतं
जे किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकतं…
म्हणूनच, संतुलित आहार घ्या, पुरेसं पाणी प्या
आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या…
थोडी काळजी घेतली तर किडनी स्टोनपासून नक्कीच बचाव होऊ शकतो…
किडनी स्टोन वाढवणारे 5 धोकादायक पदार्थ
