एज्युकेशन ट्रस्ट सय्यद नगर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष काळेपडळ पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले, समाजातील गुन्हेगारी कमी करण्याकरिता शालेय संस्थांचा त्याच पद्धतीने कामगारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. योग्य समुपदेशनाद्वारे गुन्हेगारी मुक्त समाज घडवण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत असल्याचे प्रतिपादन यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या हस्ते कामगारांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या वतीने मोफत डोळे कान नाक घसा तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे कूपन वाटप करण्यात आले. इनामदार्स एन्व्हिजन डोळ्यांचा दवाखाना व डॉ. अबोली इनामदार यांनी वैद्यकीय तपासणी कामी सहकार्य केले. तसेच सालाबादप्रमाणे 25 विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या संस्थेच्या वतीने दत्तक घेण्यात आले.
ज्येष्ठ लेखक प्रा. दिलीप गरुड यांनी विविध लोककथांच्या माध्यमातून आलेल्या कामगारांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे शिक्षक इम्रान शेख सर आणि बाळू भंडारी यांनी अण्णा भाऊ साठेंचा जग बदल घालुनी घाव हा पोवाडा सादर केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार, कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांचा प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शोएब इनामदार यांनी केले. याप्रसंगी शकीला इनामदार, रिफान इनामदार, अनिल ढावरे, शेखलाल चाचा,
मसूद शेख, शकील इनामदार, इमाम शेख, मंगेश अल्हाट, दत्ता घुले, अब्दुल रहेमान शेख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान शेख तर आभार मुसाएब शेख यांनी मांडले.
आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या वतीने कामगार दिनाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
