कोंढव्यात पोलिसांची मोठी कारवाई! २२ किलो गांजा जप्त, महिला आणि तरुण अटकेत

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोंढवा परिसरात गांजाविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
दिनांक १ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ किलो गांजा जप्त केला असून, एक महिला आणि एक तरुणाला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीनुसार, कोंढवा खुर्दमधील शिवनेरीनगर परिसरात गांजाची विक्री सुरू असल्याचे उघड झाले होते.
यानंतर पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकत आरोपींना रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये
यास्मीन करीम शेख (वय ४५) आणि
आमिर समीर शेख (वय १९)
यांचा समावेश आहे.
आरोपींकडून गांजासह रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरत आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.