“पुण्यात नंबर प्लेट नसलेल्या कचरा गाड्या? नागरिकांचा घनकचरा विभागावर गंभीर आरोप!”

Rokhthok Maharashtra 30 0

“पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८, शनिनगर-जांभूळवाडी रोड परिसरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, परिसरात धावणाऱ्या काही प्रायव्हेट कचरा गाड्यांना नंबर प्लेटच नाही!
हॉटेलचा ओला-सुका कचरा एकत्र वाहतूक केला जात असून गाडीवर कावळ्यांचा वावर वाढला आहे. हे कावळे तोंडात कचरा घेऊन नागरिकांच्या अंगावर टाकत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे हॉटेलसाठी वेगळी कचरा व्यवस्था असतानाही त्याच गाड्या घरगुती कचरा उचलण्यासाठी वापरल्या जात असल्याचा आरोप आहे.
स्थानिकांचा सवाल —
हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
कात्रज रॅम्पवर नंबर प्लेट नसलेल्या गाड्या कशा खाली होतात?
घनकचरा विभाग आणि संबंधित वरिष्ठ आरोग्य निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत आहेत का?
आता प्रशासन कारवाई करणार का… याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.”

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.