शिरूरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठी बोकड चोरीची घटना समोर आली आहे.
घरासमोर, ओट्यावर आणि गोठ्यात बांधलेले तब्बल १७ बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली.
या बोकडांची किंमत तब्बल सात ते आठ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
मंगलमूर्ती नगर, बाबूराव नगर आणि कुंभार आळी परिसरातून हे बोकड चोरीला गेले होते.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही तरुणांनी चाणाक्षपणा दाखवत तपास सुरू केला.
कोंढव्यातील कौसरबाग परिसरात हे चोरीचे बोकड विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने तिघांना पकडण्यात आलं, तर एक आरोपी फरार झाला.
शिरूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून चार बोकड जप्त करण्यात आले आहेत.
बकरी ईदसाठी मुस्लिम बांधवांनी खास कुर्बानीसाठी हे बोकड विकत घेतले होते.
दरवर्षी ईदपूर्वी अशा चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
बकरी ईदपूर्वी १७ बोकड चोरी, कोंढव्यात आरोपी रंगेहाथ पकडले!
