“पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हडपसर मतदारसंघातील एनआयबीएम रोडवरील त्रिबिका सोसायटी परिसरात भरदिवसा एका तरुणीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने तरुणीची छेड काढल्यानंतर स्वतःची दुचाकी घटनास्थळीच टाकून पळ काढला.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
या प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून,
शहरप्रमुख प्रमोद नाना भांगिरे यांनी पोलिस प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
‘पुण्यात महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि गुंडगिरी वाढत असताना पोलिसांचा धाक उरला आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, ‘या गुन्हेगारावर कठोर कारवाई झाली नाही तर शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील,’ असा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या या घटनेमुळे पुणे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.”
