पुणे

पुण्यात सायबर ठगांचा धुमाकूळ! चौघांना 1.47 कोटींचा गंडा

पुण्यात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, चौघांना तब्बल 1 कोटी 47 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील 48 वर्षीय व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
वडगाव बुद्रुकमधील एका व्यक्तीला शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 9 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.
तर आंबेगाव बुद्रुक येथील तरुणाला बिटकॉईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून 12 लाख 44 हजार रुपये उकळण्यात आले.
याशिवाय, हिंगणे परिसरातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगून 9 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.