“50 ग्रॅम पावडर टाकीन…” मुलांना धमकी देणारा पोलीस निलंबित

Rokhthok Maharashtra 7 0

“मुंबई पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल! ’50 ग्रॅम पावडर खिशात टाकीन, आयुष्य उद्ध्वस्त करेन’ अशी मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर मोठी कारवाई झाली आहे.”

“सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सायन पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी काही मुलांना दमदाटी करताना दिसत आहे. ‘पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकीन, जामीनही मिळणार नाही’ अशी गंभीर धमकी तो देताना ऐकू येतो. हा व्हिडिओ व्हायरल होताच गृह विभागाने तातडीने संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.”

“या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.