1. SIR मॅपिंगचे काम जलद गतीने पूर्ण; BLO कर्मचाऱ्यांचा शैलेजा शिंदे यांच्या हस्ते सत्कार

Rokhthok Maharashtra 32 0

कराड | SIR मॅपिंगचे काम जलद गतीने पूर्ण; उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO कर्मचाऱ्यांचा शैलेजा शिंदे यांच्या हस्ते सत्कार

कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मतदारसंघात SIR अंतर्गत मतदारांच्या 2002 सालच्या पुराव्यांची जोडणी करून मॅपिंग करण्याचे काम प्रशासनाकडून राबवण्यात आले.

कराड तालुक्यातील कोळे, कुसूर, कोळेवाडी आणि शिंदेवाडी या गावांमध्ये हे काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत संबंधित BLO कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत महत्त्वाची भूमिका बजावली.

या कामाची दखल घेत सातारा जिल्हा परिषद सदस्य शैलेजा शिंदे यांनी पुढाकार घेत संबंधित BLO कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करून कौतुक केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निवास मोरे यांच्यासह BLO कर्मचारी उपस्थित होते. शैलेजा शिंदे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण कामात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.