वाघोलीत नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर वाहतूक उघड!

Rokhthok Maharashtra 5 0

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत वाघोलीत नशेच्या “टर्मीव्हा” इंजेक्शनचा साठा जप्त; दोन आरोपी अटकेत

पुणे शहर पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत झोन-7 मधील वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या “टर्मीव्हा” इंजेक्शनची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
२२ जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आय.व्ही. इस्टेट रोड, ऑर्चिड साई प्रॉपर्टीज परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून “टर्मीव्हा” इंजेक्शनच्या १०० बाटल्या, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख १ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत ही इंजेक्शने ऑनलाइन मागवण्यात आल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या विशेष पथकाने केली. दरम्यान, झोन-7 मध्ये मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत अमली पदार्थ, अवैध गुटखा, दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.