पुण्यात FDAचा धडाका! ५५ लाखांचा निकृष्ट माल जप्त मिठाई | कँडी | चॉकलेट सील!

Rokhthok Maharashtra 9 0

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाड टाकत निकृष्ट मिठाई, कँडी, चॉकलेट, फरसाण आणि सुकामेव्याचा तब्बल ५५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे.
गणेश पेठेतील वर्धमान एंटरप्रायझेस येथून संशयित निकृष्ट अन्ना मलई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा १७ लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला. तर न्यू पांडियन एंटरप्रायझेसमधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी ताब्यात घेण्यात आली.
भवानी पेठेतील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात परवान्याशिवाय तब्बल १४ हजार किलोहून अधिक कँडी आणि चॉकलेट वेफर रोलचा ३६ लाखांहून अधिक किमतीचा साठा आढळला.
याशिवाय नाना पेठेतील इतर व्यापाऱ्यांकडून फरसाण, काजू, बदाम, मनुका आणि मसाल्याचाही साठा जप्त करण्यात आला आहे.
या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.