“आता तूच माझी बायको…” म्हणत महिला वकिलाची फसवणूक? बारामतीतील पोलीस हवालदारावर गंभीर गुन्हा

Rokhthok Maharashtra 36 0

बारामतीमध्ये एका पोलीस हवालदाराविरुद्ध महिला वकिलाने अत्यंत गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत फिर्यादीशी जवळीक वाढवली. नातेवाईकांसह विवाहाची चर्चा केली आणि मंदिरात मंगळसूत्र घालून तिला पत्नी असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघे काही काळ सहजीवनात राहिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या काळात महिला गर्भवती राहिली. मात्र, मुलगी जन्माला आल्यानंतर आरोपीने आई आणि मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याचा तसेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जबाबदारी टाळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत आणि तपासात स्पष्ट होईल.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.