मोठा दिलासा! BP, शुगर, हार्ट आणि डिप्रेशनच्या 23 औषधांचे दर सरकारने केले फिक्स | मेडिकल बिल होणार कमी

Rokhthok Maharashtra 41 0

सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! आता बीपी, शुगर, हार्ट अटॅक, डिप्रेशन आणि Anxiety सारख्या आजारांवरील अनेक औषधे स्वस्त मिळणार आहेत.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरण (NPPA) ने 23 औषधांच्या कमाल किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. यामुळे मेडिकल स्टोअर किंवा औषध कंपन्या या औषधांची विक्री सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने करू शकणार नाहीत.

https://youtube.com/shorts/NElAe4YpkDY

हा निर्णय औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 (DPCO-2013) अंतर्गत लागू करण्यात आला आहे. मात्र, जाहीर केलेल्या किमतींमध्ये GST समाविष्ट नसून तो स्वतंत्रपणे लागू होईल.
सरकारने औषध कंपन्यांनाही कडक इशारा दिला आहे. ठरलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ग्राहकांकडून जादा घेतलेले पैसे व्याजासह परत करावे लागतील.
यामुळे लाखो रुग्णांचे मेडिकल बिल कमी होण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.