क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसला आली अन् ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकली! फिजिओथेरपिस्ट तरुणीवर अत्याचाराचा आरोप

Rokhthok Maharashtra 5 0

क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसला आली अन् ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकली; फिजिओथेरपिस्ट तरुणीवर अत्याचाराचा आरोप!
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आली होती. याचदरम्यान मुख्य आरोपीने तिचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ तिच्या नकळत मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.
हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तरुणीने विरोध केल्यानंतर आरोपीचा भाऊ आणि वडील यांनीही तिला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याचा भाऊ आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लैंगिक अत्याचार, गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करणे, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि धमकी या आरोपांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.