१६०च्या स्पीडने फॉर्च्युनर बोगद्यात घुसली! टेम्पोला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 4 0

मिसिंग लिंक बोगद्यात १६० च्या वेगाने फॉर्च्युनर! टेम्पोला धडक, एकाचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. तब्बल १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या फॉर्च्युनरने मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे मित्रांसोबत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर समोरील पिकअप टेम्पोवर आदळली.
धडक एवढी भीषण होती की फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू, तर एकजण गंभीर आणि अन्य तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर बचावकार्य आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला. तब्बल दोन तास बोगद्यातील वाहतूक बंद ठेवून जुन्या महामार्गावरून वळवण्यात आली.
विशेष म्हणजे या मार्गावर वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितास असताना कार तब्बल १६०च्या वेगाने धावत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, असे अपघात टाळण्यासाठी एमएसआरडीसीकडून हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मिसिंग लिंक बोगद्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.