कराडमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीची निर्घृण हत्या; चाकूने सपासप वार, आरोपी अटकेत

Rokhthok Maharashtra 40 0

कराडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! पतीकडून पत्नीची हत्या; चाकूने सपासप वार
कराड शहरातील डुबल नगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे.
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृत महिलेचं नाव रोहिणी दत्तात्रय जांभळे असून, हल्लेखोर संशयित पती दत्तात्रय नारायण जांभळे, वय अंदाजे ३५ वर्षे, असल्याची माहिती आहे.
रविवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि याचवेळी दत्तात्रयने रोहिणी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
हत्येनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि हत्येमागचं खरं कारण काय, याचा तपास कराड पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.